शहा-पवार भेट, राज्यात उलथापालथीचे संकेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२८ मार्च २०२१

शहा-पवार भेट, राज्यात उलथापालथीचे संकेतसंसदेचे अधिवेशन आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी रात्री अहमदाबादला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे समजते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काळात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. सध्या राज्यात सचिन वाझे प्रकरणामुळे राज्य सरकार बॅक फुटवर आले असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. परिणामी, ही भेट अहमदाबादला एका बढ्या उद्योजाकाच्या घरी झाल्याचे कळते. यात राष्ट्रवादीचे बढे नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.