उद्योजकता परिचय कार्यक्रमाबाबत मोफत वेबिनारचे आयोजन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, मार्च १९, २०२१

उद्योजकता परिचय कार्यक्रमाबाबत मोफत वेबिनारचे आयोजन

 उद्योजकता परिचय कार्यक्रमाबाबत मोफत वेबिनारचे आयोजन

           

            मुंबई, दि. 17 : राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थान (NITIE) मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने १९ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ०६.३० ते ७.३० वा. दरम्यान उद्योजकता परिचय कार्यक्रमाबाबत मोफत वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी आणि सहभागी होऊन मार्गदर्शन मिळविण्यासाठी  https://bit.ly/3tjXaYK  ही लिंक आहे.

            महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालय अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थान (NITIE) मुंबई यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे.

            राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थान मुंबई येथे आजी माजी विद्यार्थ्यांकरिता उद्योजकता विकास कक्ष सुरु करणेकेंद्र आणि राज्य शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार औद्योगिक समूह विकास स्थापन करणेउद्योगविषयक विविध योजनांची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणेऔद्योगिक समूह विकास उपक्रमाद्वारे लघु उद्योजक आणि भावी उद्योजक यांना उद्योग घटक निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणेजागतिक महामारी कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या कालावधीनंतर आणि त्यादरम्यान निर्माण झालेल्या अडचणीवर मात करणेउद्योजकता विषयक ऑनलाईन तांत्रिक उद्योजकता विकास उपक्रमाचे आयोजन करणे याची माहिती देण्यात येणार आहे. या मोफत वेबिनारमध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) चे कार्यकारी संचालक श्री. सुरेश लोंढे तसेच राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थान (NITIE) चे संचालक डॉ. मनोजकुमार तिवारी मार्गदर्शन करणार आहेत.

            डॉ. हर्षदीप कांबळे विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालय यांच्या पुढाकाराने एम सी ई डी आणि निटी या दोन संस्था दरम्यान ३ वर्षांकरिता उद्योग व्यवसाय उद्योजकता विषयक उपक्रम आयोजित करण्याबाबत  सामंजस्य करार स्वाक्षरी झालेला आहे. या उपक्रमाचा उद्योजक आणि उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या युवा पिढीने जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

            नव उद्योजकभावी उद्योजक आणि प्रस्थापित उद्योजक यांनी मोफत वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी सिस्को वेबेक्स (Cisco Webex) या माध्यमाद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.अधिक माहितीकरिता श्री. शशिकांत कुंभार प्रेरक प्रशिक्षक / वरिष्ठ प्रकल्प अधिकारीमहाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोंकण भवन५वा मजलारूम नंबर ५१२सीबीडी बेलापुरनवी मुंबई ९४०३०७८७५२ अथवा डॉ. हेमा दाते डीनस्टूडेंट्स अफेअर्स आणि प्लेसमेंट्स तथा प्राध्यापक डिसीजन सायन्सेस आणि इन्फॉर्मेशन सिस्टीमराष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थानविहार लेकपवईमुंबई ९८३३०८८९७७ याठिकाणी संपर्क साधावा.