वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भात तातडीने ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करुन द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ मार्च २०२१

वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भात तातडीने ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करुन द्या


विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

लवकरच ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन




नागपूर - राज्यातील शिक्षकांचे निवड व वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव प्रशिक्षणा अभावी प्रलंबित आहे. सदर प्रकरणी तातडीने आॅनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे मंगळवारी (ता २) मुबई निवासस्थानी केली. यासंदर्भात येत्या महिन्याभरात आॅनलाईन प्रशिक्षणाची सेवा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले.
*शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांची यासंदर्भात बैठक पार पडली.*
या बैठकीत
1) *शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे*
2) पुणे शिक्षक मतदार संघाचे *आमदार श्री जयंत आसगावकर,*
3) नागपूर पदवीधर मतदारसंघाचे *आमदार श्री अभिजित वंजारी,*
4) विधान परिषद सदस्य *आमदार श्री धनंजय पवार,*
5) विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर *विभागीय सचिव खिमेश बढिये* उपस्थित होते.
♂♂♂♂♂♂♂
*मागण्या*
१)राज्यातील हजारो शिक्षकांची वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव प्रशिक्षणा अभावी प्रलंबित आहे. त्यामुळे तातडीने किमान १० दिवसांचे आॅनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन या प्रशिक्षणावर प्रस्ताव निकाली काढावे.
२) वेतन्नेतर अनुदानात (Non Salary Grand) सातव्या वेतन आयोगानुसार वाढ करण्यात यावी
३) कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक शाळेत दहावी बारावीचे परीक्षा केंद्र देण्यात यावे
४) चुकीच्या संचमान्यता दुरुस्ती करण्यासाठी तातडीने अंमलबजावणी करावी
५) थकीत देयके तातडीने काढण्यासाठी वेतन अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे
६) DCPS /NPS सानुग्रह अनुदानाच्या अटितून १० वर्षांची जाचक अट रद्द करण्यासाठी गठीत समितीपुढे शिक्षण विभागातर्फे सकारात्मक भूमिका विशद करावी या मागण्यांचा समावेश होता.
☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️
सदर विषयावर मा शिक्षण आयुक्त, मा शिक्षण सचिव, मा अर्थमंत्री यांच्यासोबत या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
*तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भात येत्या महिन्याभरात १० दिवसांच्या आॅनलाईन प्रशिक्षणासाठी लिंक उपलब्ध करून देऊन हा विषय प्राधान्याने सोडवला गेला, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे व उपस्थित आमदारांना दिले. व लागलीच शिक्षण आयुक्तांना या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश फोनद्वारे देण्यात आले.*
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
*यावेळी शिष्टंडळात उपस्थित*
1) बालकृष्ण राजुरकर (रामटेक)
2) ओम कोंगे (कुही)
3) बाबासाहेब नागरगोजे (बिड)
4) खंडेराव जगदाळे (सोलापूर)
5)विजय सोराते (जालना) 
6) राजू बर्वे (पारशिवनी) 
7) संजय उईके (रामटेक) 
8) भगवान निनावे (शिक्षकेतर कर्मचारी) 
यांच्यासह विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.