एक लाखाचा दारूसाठा जप्त तीन आरोपी अटकेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ मार्च २०२१

एक लाखाचा दारूसाठा जप्त तीन आरोपी अटकेत
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) :
वनी पाटाळा मार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असताना देशी विदेशी दारू साठ्या  सह  आठ लाखाचा मुद्देमाल माजरी पोलीसांनी जप्त केला यातील तीन आरोपींना ताब्यात घेतले ही कारवाई सायंकाळी सहाच्या दरम्यान करण्यात आली
  हर्षवर्धन दिवाकर  निमगडे वय 25 , सचिन अशोक नेरकर वय  34  रोशन हरिदास उराडे वय 36 सर्व राहणार चंद्रपूर असे आरोपीचे नाव असून हे वाहन क्रमांक एम एच 46 एल 46 46 या वाहनाने वणी हून पाटाळा मार्गे वरोऱ्या कडे जात असताना माजरी पोलिसांनी वाहनाची तपासणी केली.   यात देशी  विदेशी दारू साठा किंमत एक लाख रुपये व वाहन असा आठ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला  यातील तिन्ही आरोपींना अटक केली ही कारवाई ठाणेदार विनीत घागे, सपोनी अजित सिंग देवरे  किशोरे मित्तरवार, अतुल गुरनुले ,अनिल बैठा  ,श्रीकांत मोगरम, गुरु शिंदे, अमोल रामटेके यांनी केली.