जि प उच्च प्राथमिक शाळा अंतरगाव (अन्नुर) येथे नोटबूक वितरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० मार्च २०२१

जि प उच्च प्राथमिक शाळा अंतरगाव (अन्नुर) येथे नोटबूक वितरणजागतिक महिला दिना निमित्त जि प उच्च प्राथमिक शाळा अंतरगाव (अन्नुर)येथे गोंडवाना महिला बहुउद्देशीय संस्था बामणवाडा तर्फे नोटबुकाचे वाटप


जागतिक महिला दिनातून महिलांचा सन्मान करण्याचा बोध घ्यावा: प्राथमिक शिक्षक बाळकृष्ण मसराम यांचे प्रतिपादन

राजुरा/ प्रतिनिधी
दिनांक:- 8/3/2021
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजुरा तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या अंतरगाव (अन्नुर) गावात गोंडवाना महिला बहुउद्देशीय संस्था बामणवाडा तर्फे नोटबुकाचे वाटप करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमातून जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले असून यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. जागतिक महिला दिनातून महिलांचा सन्मान करण्याचा बोध घ्यावा. असे मत प्राथमिक शिक्षक बाळकृष्ण मसराम यांनी व्यक्त केले.

यावेळी गोंडवाना महिला बहुउद्देशीय संस्थे चे तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बाळकृष्ण मसराम, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रकाश बोटपल्ले शाळा व्यस्थापन समिती, सौ स्नेहा खोबरागड़े उपाध्यक्षा, महिला सदस्या श्रीमती फलके मॅडम, मुख्याध्यापिका सौ मंगला चांदेकर, आंगनवाड़ी मदतनीस सौ चौधरी ताई, शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते, कार्यक्रमात मोठ्या संख्येने गावातील विद्यार्थी उपस्थित होते.