जिल्हा निधीतून नांदा येथे विविध कामाचे भुमीपुजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ मार्च २०२१

जिल्हा निधीतून नांदा येथे विविध कामाचे भुमीपुजन
गौतम धोटे/ कोरपना :- 
जिल्हा निधीतून आज दिनांक २७/०३/२०२१ रोजी नांदाफाटा येथे वार्ड क्रमांक ५ मध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्त्याचे , नांदा येथील नगाजी महाराज देवस्थानाला जोडणार्‍या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व राजूरगुडा येथील हनुमान मंदिराचे सौंदर्यीकरणाच्या कामाचे भुमीपुजन जिल्हापरीषद चंद्रपूरचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य देवरावजी भोंगळे , नांदा बाखर्डी क्षेत्राचे जिल्हापरीषद सदस्य शिवचंद्रजी काळे यांचे हस्ते करण्यात आले असून भुमीपुजन सोहळ्याला माजी सरपंच घागरु कोटनाके , उपसरपंच आस्वले , ग्रामपंचायत सदस्य अभय मुणोत, रत्नाकर चटप, प्रियाताई राजगडकर यांचेसह गावातील गणमान्य व्यक्ती पुरुषोत्तम निब्रड ,सतिष जमदाळे, हारुण सिद्दिकी, महेश राऊत, पवन गारघाटे यांची उपस्थिती होते तीनही कामाकरीता जिल्हा परिषद चंद्रपूरकडून जिल्हा निधीअंतर्गत नऊ लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे जिल्हा निधीच्या कामामुळे नांदा ग्रामपंचायतीच्या विकासकामात आणखी भर पडली आहे