कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रतापगड येथे भोलेनाथाला साकडे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ मार्च २०२१

कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रतापगड येथे भोलेनाथाला साकडे

 कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रतापगड येथे भोलेनाथाला साकडे


प्रशासनाचा आदेश झुगारून प्रतापगड यात्रेत हजारो भाविकांनी घेतले भोलेनाथाचे दर्शन


.


लॉकडाऊन मुळे झाली मुले,महिला व भाविकांची कुचंबणा.
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.11मार्च:-


गोंदिया जिल्हा प्रशासनाने  जिल्ह्यातील  महाशिवरात्री यात्रा रद्द केल्या असल्या तरी अर्जुनी मोर तालुक्यातील ऐतिहासिक प्रतापगड येथे हजारो  भाविकांनी गडावरील प्राचीन शिवमंदिरात भोलेनाथाचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पुर्ण केली.

  तालुक्यातील ऐतिहासिक प्रतापगड येथे महाशिवरात्रीनिमीत्य  प्राचीन शिवमंदिर व ख्वाजा उस्मान गणी हारुनी उर्स करीता दरवर्षी मोठी यात्रा भरते. यावर्षी 11 मार्च ला महशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा  कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव पहाता, ही यात्रा प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आली.. यात्रेमधे दररोज दोन ते तिन लाख भाविक दर्शनासाठी जिल्ह्यातून व परराज्यातुन भोलेनाथाचे दर्शन व दर्ग्यावर चादर चढवून अल्ला चा गजर करतात.यावर्षी प्रशासनाच्या वतीने ही ऐतिहासिक यात्रा रद्द करण्यात आल्याने भाविकांचा हिरमोड झाला असला तरी सर्व भाविकांच्या आरोग्याचा विचार करता प्रशासनाने

यात्रा रद्द केली.प्रतापगड हे गाव लाकडाऊन करण्यात आले असुन,दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आला.  तर चारचाकी व दुचाकी वाहनासाठी पोलिसातर्फे प्रतिबंध लावण्यात आला. प्रतापगड ग्रामपंचायतने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन केले असून गावात कुठेही जमावबंदी झाली नाही, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामपंचायतने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली भाविकांनी सामाजिक अंतर पाडून व सॅनिटायझर, मास्क चा वापर करून देवदर्शना नंतर भाविक स्वगावी निघून गेले असल्याची माहिती सरपंच भोजराम लोगडे यांनी दिली.  प्रशासनाच्या वतीने कडक प्रतिबंध  लावण्यात आले असले तरी हजारो भाविकांनी पाच किलोमीटर  पायी प्रवास करुन गडावर जावुन भोलेनाथाचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पुर्ण केली. यात्रेमधे पायी प्रवास करणा-या भाविकांना मात्र कुठलेच प्रतिबंध नव्हते. हे विशेष.यात्रेच्या ठिकाणी कुठलेही दुकाने नसल्याने पुजेचा सामान घेणा-या भाविकांची तारांबळ उडाली. तर नास्तापाणी व दरवर्षी प्रमाणे अल्पोपहार नसल्याने सुध्दा भाविकांची कुचंबना झाली.अशा विपरीत परिस्थितीतही हजारो भाविकांनी भोलेनाथाचे दर्शन घेतले. 

ऐतिहासिक प्रतापगड येथे महाशिवरात्री निमीत्य भरणा-या या यात्रेचे मोठे स्वरुप निर्माण करणारे व ठिकठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणारे माजी विधानसभा अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी ऐतिहासिक प्रतापगड गडावर जावुन प्राचीन महादेव मंदिरात धार्मिकविधी प्रमाणे पुजा केली.व ख्वाजा उस्मानगनी हारुनी यांच्या दर्ग्यावर जावुन चादर चढविली. राज्यातून कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव कायमचा नाहीसा व्हावा, असे साकडे आपण भोलेनाथाकडे घातले असल्याचे नाना पटोले यांनी पत्रकारांना सांगीतले.