कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानक तसेच गाडीत विशेष उपाय योजना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ मार्च २०२१

कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानक तसेच गाडीत विशेष उपाय योजना

सुरक्षेच्या मानकांचे पालन करत, महा मेट्रोची प्रवासी सुरु असेल


*नागपूर, १२ मार्च:* कोरोना वायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेतल्या जात असून १५ मार्च ते २१ मार्च २०२१ पर्यंत नागपूर शहरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून अत्यावश्यक प्रवासी वाहतूक सेवा सुरु राहणार आहे. महा मेट्रोच्या वतीनेसुरक्षेच्या मानकांचे पालन करत कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर, प्रवासी आणि मेट्रो कर्मचारी प्रवास सुरक्षित असावा या करीता अनेक महत्वाच्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. सरकारने कोव्हीडच्या बचावासंबंधी जाहीर केलेल्या सूचना आणि नियमांसह मेट्रो सेवा नागरिकांन करिता सुरु असेल .महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी स्टेशन आणि मेट्रो ट्रेन मध्ये योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्याना दिल्या असून वेळोवेळी सुरक्षा संबंधी कार्याचा आढावा अधिकाऱ्याकडून घेत आहे.ऑरेंज लाईन मार्गिकेवर (सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजता पर्यंत दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असेल व ऍक्वा लाईन मार्गिकेवर (सिताबर्डी इंटरचेन्ज ते लोकमान्य नगर) मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळी ६.३० ते रात्री ८ वाजता पर्यत दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असेल.


*प्रवाश्यांकरता मास्क घालणे बंधनकारक:*
या अंतर्गत घेतलेल्या विशेष उपाय योजनान्तर्गत प्रवाश्यांकरता मास्क घालणे बंधनकारक आहे. मास्क घातल्याशिवाय कुठल्याही प्रवाश्याला मेट्रो स्थानकावर प्रवेश मिळणार नाही. स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याचे तापमान तपासले जाईल. यात काहीही तफावत आढळल्यास स्टेशन नियंत्रक या संबंधीची माहिती आरोग्य विभागाला देईल. प्रत्येक प्रवाश्याला सॅनिटायझर दिले जाईल आणि मेट्रो गाडीत प्रवेश करण्या आधी त्याने हात स्वच्छ करणे अपेक्षित आहे. मेट्रो गाडीत असलेल्या सर्व प्रवासी उतरल्या नंतरच नव्याने प्रवास करत असलेल्या प्रवाश्यांना डब्यात प्रवेश दिला जाईल. प्रवाश्यांनी लिफ्ट किंवा इतर उपकरणांच्या बटनांना, तसेच एस्केलेटरच्या बारला स्पर्श करू नये ही हि अपेक्षा आहे.

*प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग:* मेट्रोने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याचे तापमान स्टेशनच्या प्रवेश द्वारावर तपासले जाईल. ज्या प्रवाश्यांचे तापमान ३८ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल किंवा ज्यांना सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल अश्या प्रवाश्यांना प्रवास करण्यास मनाई असेल. सोशल डिस्टंसीग संबंधी मानकांचे पालन करण्याकरिता स्टेशनवरील तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्मसह मेट्रो गाडीत त्या संबंधी दिशा-निर्देश दिले आहेत.


*डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन:*
प्रवाश्यांनी डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावीत याकरिता महा मेट्रोच्या वतीने प्रवाश्याना प्रोत्साहित केल्या जात आहे. उपकरणांना कमीत कमी स्पर्श व्हावा या करीता हे पाऊल उचलले गेले आहे. महा मेट्रो ऍपचे प्रवाश्यानी वापर करावे हे सुचविण्यात येत आहे. महा मेट्रो तर्फे डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावे याकरिता प्रोत्साहन दिले जात असले तरीही नगद पैसे देत तिकीट देखील घेता येईल. अश्या प्रकारे जमा झालेली रोख-रक्कमेचे विशिष्ट उपकरणांच्या माध्यमाने अल्ट्रा-व्हायलेट किरणांच्या मदतीने निर्जंतुकीकरण करण्यात येते येणारी तसेच जाणारी रोख-रक्कम वेगली ठेवल्या जाते.

*ट्रेन, स्टेशनचे सातत्याने निर्जंतुकीकरण:* सर्व मेट्रो ट्रेन आणि स्टेशनचे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात येते. मेट्रोचे कर्मचारी हॅन्ड ग्लोव्ह , मास्क परिधान करून असतात. या शिवाय बेबी केयर कक्ष, तिकीट खिडकी, स्टेशन कंट्रोल कक्षाची ठराविक वेळानंतर सफाई करण्यात येते.*५०% क्षमतेने मेट्रो सेवा सुरु :* महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्प ५०% क्षमतेने सुरु राहणार असून मेट्रो ट्रेनच्या आत आवश्य दिशा निर्देशक चिन्ह लावण्यात आले आहे. ५ पेक्षा जास्ती नागरिक एकत्र येऊ नये या करता महा मेट्रोच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतल्या जात आहे.अश्या प्रकारे प्रवाश्यांच्या सुरक्षेकरता महा मेट्रो सर्व प्रकारची काळजी घेत आहे. या सर्व उपाय योजनांमुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांचा विश्वास नक्कीच वाढेल. महा मेट्रो एकीकडे सर्व प्रकारच्या उपाय योजना करत असतानाच, मेट्रो प्रवाश्यांनी देखील सह-प्रवाश्यांना कुठलाही त्रास होऊ नये याकरिता या सर्व सूचना तसेच मानकांचे पालन करावे हे आव्हान करीत आहेत.