नागपुरात कोरोनाची हद्दपार; १ हजार ९७९ व्यक्ती कोरोना बाधित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मार्च २०२१

नागपुरात कोरोनाची हद्दपार; १ हजार ९७९ व्यक्ती कोरोना बाधित
#नागपुर इथं आज देखील #कोरोना रुग्णांची उचांकी संख्या नोंदवली गेली. आज नागपुरात १ हजार ९७९ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आढळून आले.


#भंडारा जिल्ह्यात आज 46 #कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13419 झाली असून आज 75 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14193 झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.55 टक्के आहे.  


#गडचिरोली जिल्हयात आज 21 नवीन #कोरोनाबाधित आढळून आले. तसंच 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9817 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9503 वर पोहचली. सध्या 206 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

15 ते 21 मार्चदरम्यान कडक टाळेबंदीसह संचारबंदीही लागू 

कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. बाधितांच्या संख्येत रोज नव्याने भर पडत आहे. प्रशासनाला कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात अपयश आलेले आहे. त्यामुळेच नागपूर शहर सिमेत 15 ते 21 मार्चपर्यंत टाळेबंदी लावण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केली. विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी बोलताना डॉ. राऊत म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. शनिवार, रविवार असे दोन दिवस अंशत: टाळेबंदी लावण्यात आली होती. या दरम्यान लोक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसले. परिणामत: शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. काल 1710 बाधित आढळून आले. त्यामुळे नागपुरकरांच्या जीविताच्या दृष्टीने नागपूर शहर पोलिस मुख्यालयाच्या हद्दीत येत्या 15 ते 21 मार्चदरम्यान कडक टाळेबंदीसह संचारबंदीही लागू करण्यात येत आहे.