शेतातील घरात वृद्ध दाम्पत्याची हत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२८ मार्च २०२१

शेतातील घरात वृद्ध दाम्पत्याची हत्या
आठ महिन्यांनी गुन्हा दाखल

वृद्ध दाम्पत्याचा आठ महिन्यापूर्वी आढळला होता मृतदेह.
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) -  
तालुक्यातील चोरा येथील शेतातील घरात कुजलेल्या अवस्थेत एका वृद्ध पती पत्नीचा मृतदेह दिनांक 28 जुलै 2020 ला आढळला होता या घटनेचा पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. . या घटनेचा तब्बल आठ महिन्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
 यातील मृतक गजानन आसुटकर वय 62 वर्षे व शीला असुटकर वय 55 वर्ष राहणार चोरा अशी मृतकांची नावे आहेत गजानन यांचे चोरा गावापासून दोन किमी अंतरावर शेती आहे या शेतात घर होते दोघेही पती-पत्नी राहत होते त्यांची चारही मुले नोकरीवर असून ती भद्रावती येथे राहतात दिनांक 28 जुलैला या दोघांचा खाटेवर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला डॉक्टरांनी यांचे शवविच्छेदन जागेवरच केले व त्यांचे अवशेष आरोग्य तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मृतकांची मुले प्रदिप आसुटकर व शरद आसुटकर यांनी आपल्या आईवडिलांची अकस्मात मृत्यू किंवा आत्महत्या  नसून येथील काही संशयितांनी त्यांची हत्या  केला होता असा आरोप केला होता . या घटने बाबत गृहमंत्री तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते एकाच वेळेस दोघांचा अकस्मात मृत्यू होणे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे भद्रावती पोलिसांनी या वृद्धाची हत्या झाली असल्याचा गुन्हा दिनांक 26 रोज शनिवार ला दाखल केला आता यातील संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि सुधीर वर्मा करीत आहे.