रेल्वेत मोबाईल चार्जिंगवर 'बॅन' - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० मार्च २०२१

रेल्वेत मोबाईल चार्जिंगवर 'बॅन'
आगीच्या घटनांमुळे घेतला निर्णय 


नागपूर : अलीकडे देशात रेल्वेमध्ये आगीच्या घटना घडलेल्या आहेत. यावर आळा घालण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाने रात्रीच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप चार्ज पॉईंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमांमध्ये बदल केल्याने हजारो प्रवाशांना फटका बसणार आहे. रेल्वे प्रवासात घडणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे समजते. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रात्री ११ ते पहाटे ५ दरम्यान रेल्वे गाड्यांमधील चार्जिंग पॉईंट बंद राहतील. त्यामुळे प्रवाशांना त्यांचा वापर करता येणार नाही.