महिलांनी घेतला मनसेत प्रवेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ मार्च २०२१

महिलांनी घेतला मनसेत प्रवेश
नागपूर_दक्षिण _विधानसभा क्षेत्र, येथील अनेक महिलांनी आज #_मनसे महिला सेना _कार्यालयात येऊन मा. श्री #_राजसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन महिला सेनेच्या सरचिटणीस सौ रिता ताई गुप्ता व प्रदेश सरचिटणीस
मा. श्री #_हेमंत_गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनात , महिला शहर अध्यक्ष _सौ मनीषा पापडकर यांच्या नैतृत्वावर विश्वास ठेवून मनसे महिला सेनेत_पक्ष_प्रवेश केला.

सहसचिव सौ स्वाती जैस्वाल,दक्षिण विभाग अध्यक्ष मंजुषा पानबुडे, शहर उप प्रमुख पुनम चाडगे यांनी यासाठी पुढाकार घेतला.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ कोल्हे , शहर अध्यक्ष श्री विशाल बडगे, शहर उप प्रमुख प्रशांत निकम, शहर सचिव घनश्यामजी निखाडे ,दक्षिण विभाग अध्यक्ष श्री पिन्टू बिसेन , पूर्व विभाग अध्यक्ष श्री ऊमेशजी उत्तखेडे ,मध्य विभाग अध्यक्ष शंशाक गिरडे , दक्षिण सचिव लोकेश कामडी ,अंकीत झाडे अभय व्यवहारे निमिश पाटणकर प्रामुख्याने उपस्थित होते.. पक्ष प्रवेश घेणाऱ्या महिलांना मनसेचा ध्वज आणि दुपट्टा देऊन पक्षात स्वागत करण्यात आले. महिला शहर अध्यक्ष सौ मनीषा पापडकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शहरात महिला शक्ती वाढविणे , अन्यायच्या विरोधात मनसे महिलाच्या पाठिशी खंबीरपणे ऊभी आहे असा आत्मविश्वास महिलांना सदस्य यांना दिला.सरचिटणीस हेंमत भाऊ गडकरी यांनी पक्षाची विचारधारा नविन सभासदांना समजावून सांगितली व आपल्या कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणे सामाजिक कामे करून लोकांची मने जिंका, नक्कीच यश तुमच्या पाठीशी राहील असा विश्र्वास व्यक्त केला. शहर अध्यक्ष विशाल बडगे यांनी सर्व नवोदित सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या मनसे पदाधिकारी यांचे आभार मानले.
पक्ष प्रवेश घेणाऱ्या सौ कांचन देवगडे ,प्रतिभा मेश्राम,शारदा क्षिरसावळे, कविता खंडाळे ,झानेश्वरी हटवार भारती वाहने . इत्यादी महिलांनी मनसे महिला सेनेत प्रवेश करून संघटना भक्कमपणे ऊभी करण्याचा निर्धार घेतला.