मनसे सदस्यता अभियानाला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद : आम जनता झाली सहभागी - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, मार्च १४, २०२१

मनसे सदस्यता अभियानाला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद : आम जनता झाली सहभागीमहाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांनी आज १४ मार्च पासून मनसे सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शिवाजी पार्क दादर येथे सकाळी १० वाजता केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या अभियानाला सुरवात झाली *त्या अनुषंगाने नागपूरात मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या हस्ते या अभियानाचा श्रीगणेश करण्यात आला.
धरमपेठ स्थित मनसे कार्यालयाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणी अभियान राबविले गेले. यावेळी मनसेचे नागपूर शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि मनसे अंगीकृत संघटनांचे संघटक उपस्थित होते.
*सकाळी दहापासून सुरू झालेल्या या नोंदणीत आम नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मनसेचे सदस्यत्व स्वीकारले यात ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, तरुण युवकांचा सहभाग लक्षणीय होता*. वर्ष २०२१ ते २०२३ या कालावधीसाठी ही नोंदणी मनसेने केली आहे. सदस्य होणाऱ्या प्रत्येक सभासदाला श्री राजसाहेब ठाकरे यांचे हस्ताक्षर असलेले सदस्य ओळख पत्र मिळणार आहे.
*नागपुरातील सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करतांना प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी उपस्थित पदाधिकारी व नागरिक हे या अभियानात मोठ्या संख्येने सामील झाल्याबद्दल त्यांचे शब्दसुमनांनी स्वागत केले* आणि नागपूर शहर व ग्रामीण भाग तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यात हे अभियान यशस्वीरीत्या आम नागरिकांपर्यंत पोहचवा, सर्वदूर भागातून मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले अनेक इच्छुक तरुण, सामान्य नागरिक फोनवर संपर्क साधून मनसेत सामील होण्याची इच्छा व्यक्त करीत असतात अश्या सर्व समाजातील सामान्य जनतेला आपल्या पक्षात सामील करून घ्या , प्रत्येक  वॉर्ड, प्रभागात सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घ्या..  कोरोनाचे संकट पुन्हा गडद होत आहे तरी आवश्यक ती खबरदारी घ्या. कोरोना नियमांचे पालन करून आज सुरू झालेली ही सदस्य नोंदणी मोहीम येत्या कालावधीत यशस्वी करा अश्या सूचना हेमंत गडकरी यांनी उपस्थित मनसे पदाधिकारी यांना दिल्या.
*नागपूर जिल्हा व शहर पदाधिकारी आणि मनसे कार्यकर्ते यांनी पहिल्याच दिवशी दोन हजार सदस्य नोंदणीचा टप्पा ओलांडला*. ऑफलाईन व ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज उपलब्ध असून इच्छुक नागरिकांनी आपल्या परिसरातील मनसे कार्यकर्ते  यांचेशी संपर्क साधावा   किंवा काही तांत्रिक अडचण असल्यास *९८२३०१७४१५* आणि *७०५७९३८६६९* या व्हॉटस् ॲप   क्रमांकावर संपर्क साधावा असे शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी सांगितले.

यावेळी श्री हेमंत गडकरी यांच्यासह जिल्हाध्यक्ष किशोर सरायकर व सतीश कोल्हे,नागपूर शहर अध्यक्ष अजय ढोके, शहर सचिव श्याम पूनियानी व घनश्याम निखाडे, महिला सेनेच्या शहर अध्यक्षा संगीता सोनटक्के व मनीषा पापडकर, मनविसे चे विदर्भ प्रभारी आदित्य दुरुगकर,  जिल्हा सचिव मनोज गुप्ता,वाहतूक जिल्हा संघटक सचिन धोटे, मनविसे जिल्हाध्यक्ष दिनेश ईलमे, उत्तर विभाग अध्यक्ष उमेश बोरकर,  पूर्व विभाग अध्यक्ष उमेश उत्तखेडे, दक्षिण विभाग अध्यक्ष पिंटू बिसेन,मध्य विभाग अध्यक्ष शशांक गिरडे , द. प. विभाग सचिव तुषार गिरहे, उत्तर विभाग सचिव महेश माने, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे शहर संघटक नितिन बंगाले, विभाग चिटणीस शुभम पिंपळापुरे व सुधीर बोरेकर,  गोकुलपेठ प्रभाग संघटक अमित सायरे, महिला सेनेच्या अचला मेसन, स्वाती जयस्वाल, पूनम चागडे, मनीषा पराड,कामगार सेनेचे गणेश मुदलियार, सर्वश्री लाला ससाणे, अजय सिरसवार, सुभाष ढबाले, अरविंद सावरकर,हमीद अन्सारी, बबलू गायकवाड, मोहित देसाई,अण्णा गजभिये, निमिष पाटणकर, आशिष बोकाडे, आशिष उईके, महेशसिंह गहेरवार, ईशांत कनोजिया, शोनक देशमुख, प्रशांत बनसोड, रवी तेलंग आशिष रामटेके, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.