मनसेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, मार्च ०९, २०२१

मनसेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५वा वर्धापन दिन नागपुरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उत्साहात साजरा केला.
मनसे नागपूर तर्फे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवर ज्येष्ठ पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला.

आपल्या लेखणीतून सामाजिक समस्यांना वाचा फोडून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणणारे निष्पक्ष आणि पत्रकारिता क्षेत्रात नामांकित अश्या ज्येष्ठ पत्रकारांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

मराठी भाषा दिवस आणि मनसे वर्धापन दिनाचे औचित्य साधून गेल्या वर्षी सुध्दा मनसेने साहित्य, कला, क्रीडा, संगीत, पत्रकार इत्यादी क्षेत्रातल्या मान्यवरांच्या व्यक्तिगत भेटी घेऊन सत्कार केला होता.

या शृंखलेत महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, लोकमतचे माजी संपादक गजानन जानभोर, तरुण भारत चे संपादक गजानन निमदेव, लोकमतचे संपादक कमलेश वानखेडे, सकाळचे तत्कालीन संपादक शैलेश पांडे, सकाळचे ज्येष्ठ पत्रकार राजेश चरपे, राजेश प्रायकर, पुण्यनगरीचे ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ पांडे, वैभव व्यवहारे,लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार राम भाकरे, देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उत्तलवार, लोकशाहीचे संपादक भास्कर लोंढे, उपसंपादक राकेश भिलकर अश्या विविध मान्यवरांशी भेटी घेऊन सामाजिक राजकीय घडामोडींवर चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घेतले होते.

नवभारत हिंदी दैनिकाचे संपादक संजय तिवारी तसेच इंग्रजी दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य यांच्या गौरव प्रसंगी लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रामुळे अनेक महत्वाचे विषय सर्वसामान्य जनतेसमोर येत असतात याद्वारे सामाजिक दिशा ठरविण्याचे मुख्य कार्य वर्तमान पत्राद्वारे होत असते असे प्रांजळ मत हेमंत गडकरी यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शहर अध्यक्ष अजय ढोके, उपशहर अध्यक्ष रजनीकांत जिचकार, विभाग अध्यक्ष उमेश बोरकर विभाग सचिव तुषार गिऱ्हे, विभाग उपाध्यक्ष हर्षद दसरे, विभाग सहसचिव पंकज नागपूरे, विभाग संघटक अक्षय दहिकर, विभाग उपसंघटक मोहित देसाई, यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.