ब्रेकिंग न्यूज : युवकाची क्षुल्लक वादातून हत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या


२३ मार्च २०२१

ब्रेकिंग न्यूज : युवकाची क्षुल्लक वादातून हत्याअनिल इंगोले
भद्रावती - माजरी येथील स्थानिक वॉर्ड क्रमांक ६ येथील रहिवासी कृनाल कुमरे या  युवकाची क्षुल्लक वादातून हत्या झाल्याची घटना नुकतीच समोरीस आली आहे.

कृनाल कुमरे हा दारू पिऊन घरी जात असताना नत्थु खारकर यांच्या घरासमोरून जात असतांना शुल्लक कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले होते दरम्यान वाद झाला. नत्थु खारकर यांचा मुलगा ज्ञानेश्वर नथु खारकर याने राग अनावर झाल्याने बैलगाडीच्या उभारीने कृनाल कुमरे याला मारहाण केली.  तो नालीत पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गम्भीर दुखापत झाली.  त्यामध्ये काही नागरिकांनी वाद सोडवत कृनाल कुमरे याला स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु प्राथमिक उपचार करून येथील वैधकीय अधिकाऱ्यांनी त्यांना  चंद्रपूर येथे हलविण्यास सांगितले व त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.  डोक्याचे ऑपरेशन करण्यात आले परंतु डोक्यावरील घाव हे गम्भीर स्वरूपाचे असल्याने कृनाल कुमरे याचा मृत्यू झाला.

माजरी पोलिसांनी कार्यवाही करत नत्थु खारकर तसेच त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर नत्थु खारकर याला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही माजरी पो.नि. विनीत घागी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.