सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ मार्च २०२१

सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का?थकीत बिलं भरण्यासाठी थेट गाण्याच्याच माध्यमातून थकबाकीदारांना आवाहन केले आहे. 'सोनू तुला वीजबिल भरायचं नाय का?, असे म्हणत वीजबिल भरण्यासाठीचे सगळे प्रयोग करुन झाल्यानंतर आता महावितरणने गाण्याच्या माध्यमातून थकबाकीदारांना साद घालण्यात येत आहे. यासाठी महावितरणने एक ऑडीओ क्लिप तयार केली आहे.  


गाणे..

सोनू आहे राजाची शान, सोनूला गावात मान, 

सोनूचा मोबाईल भारी, सोनूची गाडी पण भारी

सोनू आमचा ग्राहक लाडका, आम्ही त्याला वीज देतो बरं का?, 

सोनूची कॉलर टाईट,


वीज बिल भरायला वाटतंय वाईट, 

सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का?

सोनू आमचा आंघोळीला जातो, 

गिजरला लागते लाईट, 

मात्र वीज बिल भरायला वाटते वाईट