महावितरण अभियांत्यास मारहाण करणाऱ्यास अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२५ मार्च २०२१

महावितरण अभियांत्यास मारहाण करणाऱ्यास अटकनागपूर, दिनांक २५ मार्च२०२१-

वीज देयकाच्या थकबाकीची वसुली करीत असताना  महावितरण सोमलवाडा शाखेचा सहाय्यक अभियंता, संजय भकते यांना शिवीगाळ व मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एचबी टाऊन, रहमतनगर येथील रशीद चांद सय्यद वय ३४ वर्ष या आरोपीस सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १३ मार्च २०२१रोजी घडली होती.

महावितरण कडून या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीरच्या विरोधात भादवि कलम ३५३,२९४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर आरोपी फरार होता.पोलिस आरोपीचा शोध घेत होते.३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मध्ये ठेवल्यावर आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.