आघाडी सरकारमध्ये खांदेपालट; मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ मार्च २०२१

आघाडी सरकारमध्ये खांदेपालट; मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार


 

राज्यात लवकरच मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहे. एप्रिल महिन्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप झाल्यामुळे राष्ट्रवादी अडचणीत आली आहे. विरोधकांनी अनिल देशमुख यांची मागणी लावून धरली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, त्यामुळे राजीनामा घेणार नाही, असं स्पष्ट केले आहे.  पण, अखेर आता राष्ट्रवादीने गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एप्रिल महिन्यात खांदेपालट होणार आहे. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या गृहखात्यात बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.