लॉकडाऊनचा आदेश अचानक घेतला मागे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मार्च २०२१

लॉकडाऊनचा आदेश अचानक घेतला मागेमहाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून पुन्हा एकदा निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. मात्र हे निर्णय घेताना शासन-प्रशासनामध्ये संवादाचा अभाव होत असल्याचं दिसत आहे. दोन जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय अचानक रद्द करण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात शनिवार आणि रविवार या दिवशी कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. मात्र हा आदेश अवघ्या दोन तासातच मागे घेण्यात आला. सायंकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतची संचारबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे.

आस्थापने दोन दिवस बंद ठेवण्याच्या आदेशानंतर जिल्हाभरातून व्यापारी, व्यावसायिकांचा रोष पाहता जिल्हा प्रशासनाने शनिवार, रविवार या दिवशी संपूर्ण लॉकडाऊनचा आदेश मागे घेतला आहे. ही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली. दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचा आदेश कायम राहील, असंही दिनेश गीते यांनी म्हटलं. त्यामुळे सुरुवातीला दोन दिवस कडक संचारबंदीचा आदेश रद्द समजण्यात यावा, असं सांगण्यात आलं आहे. तसंच पूर्वीच्या आदेशाचे शुद्धीपत्रकही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.