अपहरण करणाऱ्या टोळीतील खंडणीखोर व खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचेकडून अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ मार्च २०२१

अपहरण करणाऱ्या टोळीतील खंडणीखोर व खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचेकडून अटक

 अपहरण करणाऱ्या टोळीतील खंडणीखोर व खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचेकडून अटकजुन्नर /वार्ताहर 


        

      पश्चिम बंगाल राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे पीएसआय खान यांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक  अभिनव देशमुख यांची भेट घेऊन माहिती दिली की, सलानपुर पोलीस स्टेशन राज्य पश्चिम बंगाल गु. र. नं. 51/2019, भादवि कलम 365 मधील फिर्यादी जोगिंदर सिंग यांचा मुलगा तेजपाल सिंग याचे अज्ञात इसमांनी अपहरण केले होते.


 सदर गुन्ह्यातील एक आरोपी नामे राकेश कुमार शत्रुघ्न सिंग हा पुणे ग्रामीण हद्दीत लोणीकंद येथे  राहत असून काम करीत आहे अशी माहिती दिल्याने  माननीय पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदर बाबत कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना दिले. सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणीकंद भागात सदर आरोपीचा शोध घेत असताना तो देहू रोड भागात गेले असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा देहूरोड भागात शोध घेतला असता  एक संशयित इसम मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी करता त्याने त्याचे नाव करण सिंग असल्याबाबत सांगितले. त्याचे कडे असलेले कागदपत्र पाहणी केली असता त्यावर देखील करण सिंग हे नाव असल्याचे आढळून आले परंतु सदर इसमाचा संशय आल्याने व तो खोटे बोलत असल्याबाबत  दिसून आल्याने त्यास विश्वासात घेऊन  विचारपूस करता  त्याने तो गेली दोन वर्षापासून नाव बदलून बनावट कागदपत्रे बनवून पुणे येथे राहत असल्याबाबत ची माहिती सांगितली त्याकडे त्याचे नाव व पत्याबाबत पुन्हा विचारपूस करता त्याने त्याचे खरे नाव  

राकेश कुमार शत्रुघ्न सिंग वय 29 वर्ष रा. कृष्णापुरी चुटिया झारखंड असे असल्याचे सांगून वरील गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. तसेच  स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व टीम यांना सदर चा आरोपी हा गुन्हेगार प्रवृत्तीचा वाटल्याने त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आणखी एक खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे व तो त्याही गुन्ह्यात फरार असल्याचे सांगितले आहे.  त्यास ताब्यात घेऊन राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पश्चिम बंगाल शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर खान यांच्या ताब्यात दिले आहे. सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक सो श्री. अभिनव देशमुख सो अप्पर पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील सो यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट सो. यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नेताजी गंधारे सहा. फौजदार थोरात पो हवा विक्रमसिंह तापकीर पो ना दिपक साबळे पो कॉ. संदीप वारे पो कॉ. निलेश सुपेकर पो हवा क्षीरसागर पो हवा पासलकर पो कॉ अक्षय जावळे यांनी केली