कोरोना लसीकरण केंद्रांना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ मार्च २०२१

कोरोना लसीकरण केंद्रांना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट

कोरोना लसीकरण केंद्रांना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेटअधिका-यांना केल्यात महत्वाच्या सुचना


 

           कोरोना लसीकरण केंद्रावर येणा-या नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावेप्रत्येक केंद्रावर थंड पिण्याच्या पाण्याची व नागरिकांना बसण्याची उत्तम सोय करण्यात यावी तसेच सकाळसंध्याकाळ अशा दोन वेळेस कोरोना लसीकरण करण्यात यावे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबधीत विभागाला केल्या आहे.
           आज पासून सुरु करण्यात आलेल्या बाबूपेठ व इंदिरा नगर येथील कोरोना लसीकरण केंद्राला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली असून नागरिकांच्या सुविधेसंदर्भात सदर महत्वाच्या सुचना केल्या आहे. यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अविष्कार खंडारे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकरशहर संघटक विश्वजित शाहादूर्गा वैरागडे  तापूष डेराशिद हुसेनमहेश काहीरकरसविता दंडारेआशा देशमूख आदिंची उपस्थिती होती.

   मध्यंतरी आटोक्यात आलेला कोरोना पून्हा वाढू लागला आहे. दिवसाला शेकडो रुग्णांचा अहवाल पॉझेटीव्ह  येत असल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. मात्र नागरिकांनी घाबरुन न जाता सर्तक राहण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे. दरम्याण आज पासून सुरु करण्यात आलेल्या बाबूपेठ व इंदिरा नगर येथील कोरोना लसीकरण केंद्राला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत येथील कामाची पाहणी केली. उन्हाचा पारा दिवसागणीक चढत आहे. त्यामूळे येथे लसीकरणासाठी येणासाठी येणा-या वयोवृध्द नागरिकांना येथे पिण्याच्या थंड पाण्याची सोय करण्यात यावीत्यांच्या बसण्यासाठी व्यवस्था करण्यात यावीतसेच कोरोना लसीकरणासाठी येणा-या नागरिकांची गर्दी लक्षात घेता सकाळ सह आता संध्याकाळीही कोरोना लस देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबधित विभागाला दिल्या आहेत. तसेच यावेळी आ. जोरगेवार येथे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशीही चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या यावेळी लसीकरणासाठी समोर आल्याबद्दल आ. जोरगेवार यांनी सदर नागरिकांचे स्वागत केले. यावेळी येथील डाॅक्टर व कर्मचा-यांची उपस्थिती होती.