जुन्नरमधील इतिहासकालीन वेस दुरुस्तीचे काम निकृष्ट ? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या


२६ मार्च २०२१

जुन्नरमधील इतिहासकालीन वेस दुरुस्तीचे काम निकृष्ट ?

 जुन्नरमधील इतिहासकालीन वेस दुरुस्तीचे काम निकृष्ट ?         पाऊणशे नागरिकांच्या सह्यांचे निवेदन

जुन्नर /आनंद कांबळे 

जुन्नर शहरातील सदाबाजार पेठेतील इतिहासकालिन वेशीच्या दुरुस्तीचे काम नगरपालिकेकडून सुरु आहे.मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची

तक्रार नागरिकांनी केली आहे.याबाबत पालिका प्रशासनाला पाऊणशे नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.हे काम त्वरीत थांबवावे अशी

मागणी करण्यात आली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,की मूळ वेशीच्या स्लॅबला चिरा गेलेल्या आहेत.त्यामुळे हा स्लॅब कधीही कोसळून अपघात होऊ

शकतो तर जीवीतहानी होऊ शकते.तर मूळ साचालाही तडे गेलेले आहेत,त्यामुळे दुर्घटना घडू शकते,वेशीची नव्याने दुरुस्ती करण्यात येत आहे.मात्र

हे काम करण्यापूर्वी त्याचा पाया आणि बाजूची भिंत यांचे दगड सुटे झालेले आहेत.याची दखल घेऊन दुरुस्तीचे काम करणे गरजेचे आहे.


स्लॅब कोसळण्याचा धोका..

वेशीच्या स्लॅबला मुळातच चिरा गेलेल्या आहेत.त्यामुळे,स्लॅब कोसळून काही दुर्घटना घडू शकते,याबाबत अनेकदा निवेदने दिलेली आहेत,याची

 संबंधितांनी दखल घेऊन हे काम नव्याने करण्यासाठी तरतूद करावी.अन्यथा काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार पालिका प्रशासन राहील.जुन्नर-येथील सदाबाजार पेठेतील वेशीचे काम सुरु असून ते निकृष्ट असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

-श्रीकांत जाधव(स्थानिक रहिवासी,जुन्नर)


मजबूतीकरण करणार..

नागरिकांच्या मागण्यांची योग्य ती दखल घेतली आहे.स्लॅब जुना आहे.त्यामुळे त्यावर जास्त अवजड वजन राहणार नाही या दृष्टीकोनातून विटा किंवा

दगडी बांधकाम न करता,तुलनेने वजनात हलक्या असलेल्या सिमेंट ब्लॉकचा वापर करण्यात येत आहे.याचा अर्थ काम निकृष्ट आहे असा आरोप

करणे योग्य नाही,चांगल्या प्रकारे वेशीचे सुशोभिकरण करण्यात येत आहे.जुन्नर शहराच्या ऐतिहासकि वारशाला शोभेल असेच काम केले जात आहे.

त्यासाठी स्लॅबच्या मजबूतीकरण करुनच हे काम मार्गी लावण्यात येईल.

-मच्छिंद्र घोलप(मुख्याधिकारी,जुन्नर नगरपरिषद)