इंग्लंडच्या शोधप्रबंधात गोंङपिपरीचा इतिहास - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ मार्च २०२१

इंग्लंडच्या शोधप्रबंधात गोंङपिपरीचा इतिहास
गोंडपिपरी/प्रतिनिधी
गोंडपिपरीच्यया इतिहासाने ब्रिटिश अधिकार्यांना भुरळ घालली होती. ब्रिटिश अधिकार्यांनी या भागात संशोधन केले. तर दिल्ली, मुंबई, पुणे आणि नागपुरातील संशोधकांनी गोंडपिपरीचा भुगर्भात दडलेला इतिहास जगासमोर मांडला. आता थेट लंडन मधून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रातून गोंडपिपरीचा इतिहासावर शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. या शोध निबंधाने मागासलेल्या गोंडपिपरीचे नाव सातसमुद्र पार पोहचविले आहे.

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा येथिल पत्रकार निलेश झाडे यांनी शोधलेल्या वाकाटकांचा राजमुद्रेवर लिहीलेला अमोल बनकर,अशोक सिंह ठाकुर यांचा शोध निबंध journal of the oriental numismatic society
या लंडन मधून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रात प्रकाशित झाला आहे. विशेष म्हणजे सदर राजमुद्रा गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथे सापडली आहे.
वाकाटक राजा पृथ्वीसेन( व्दितीय ) यांची राजमुद्रा गोजोली येथिल प्रकाश उराडे यांनी सांभाळून ठेवली होती.प्रकाश उराडे यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा रंजित उराडे यांनी वडीलांचा संदुक उघळला.त्या संदुकात राजमुद्रा होती. सदर राजमुद्रा रंजित उराडे यांनी धाबा येथिल पत्रकार तथा इतिहास अभ्यासक निलेश झाडे यांना दाखविली.

या राजमुद्रेवर बोधीसत्व तारा यांचे चित्र अंकित होते तर राजमुद्रेवर ब्राम्हीलीपीतील लेख होता. राजमुद्रेवरील लेख चंद्रपुर जिल्ह्यातील प्रसिद्ध इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर,मुंबई येथिल अशोक बनकर यांनी वाचला. त्यानंतर या राजमुद्रेचा इतिहास उजेडात आला.

या राजमुद्रेवर ठाकूर आणि बनकर यांनी शोध निबंध लिहीला.हा शोध निबंध लंडन मधून प्रकाशित होणाऱ्या journal of the oriental numismatic society मध्ये प्रकाशित झाला.या शोध निबंधात पत्रकार निलेश झाडे यांनी राजमुद्रेचा शोध लावला असा उल्लेख करण्यात आला आहे. सदर राजमुद्रा नागपुर येथिल मध्यवर्ती संग्रालयात ठेवण्यात आली आहे. यानिमित्याने गोंडपिपरीचा इतिहास सातासमुद्रापार गेला आहे.