जिल्हा परिषद अनुकंपाधारकांची अंतरीम निवड यादी प्रसिध्द - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ मार्च २०२१

जिल्हा परिषद अनुकंपाधारकांची अंतरीम निवड यादी प्रसिध्द

जिल्हा परिषद अनुकंपाधारकांची अंतरीम निवड यादी प्रसिध्द

Ø 19 मार्चपुर्वी आक्षेप व हरकत आमंत्रीत
चंद्रपूर, दि:15,  जिल्हा परिषद अंतर्गत पदभरती-2019 चे अनुषंगाने अनुकंपा धारकांमधून नियुक्ती देण्याकरिता उपलब्ध प्रवर्गनिहाय पदे व अनुकंपा धारकाची शैक्षणिक अर्हता विचारात घेवून प्रस्तावीत अंतरीम निवड यादी कार्यालयाचे zpchandrapur.maharashtra.gov.in व enoticeboard-zpchandrapur.com  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सदर अंतरीम निवड यादीवर अनुकंपा धारकांचा आक्षेप/हरकती असल्यास अर्ज व आक्षेपाशी संबंधीत आवश्यक दस्तऐवज दि.19 मार्च 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,चंद्रपूर येथे सादर करावे. विहीत मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपाचा/हरकतीचा विचार केला जाणार नाही. तसेच अनुकंपा पदभरती ही शासन निर्देशानुसार करण्यात येत असून या संदर्भात समाजमाध्यमाद्वारे पसरविण्यात येणाऱ्या कोणत्याही अपप्रचाराला अनुकंपा धारकांनी बळी पडू नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल कर्डिले, यांनी केले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे यांनी कळविले आहे.