खबरबात Impact: सिंदेवाहीत रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२४ मार्च २०२१

खबरबात Impact: सिंदेवाहीत रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त
   
सिंदेवाहीचे तहसीलदार जगदाळे यांची कारवाईसिंदेवाही तालुक्यातील अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर रावर सिंदेवाही येथील तहसीलदार यांनी कारवाई केली आहे. यातील एक ट्रॅक्टर वर क्रमांक नसून, ट्राली क्रमांक एम एच 34 बी आर 34 21 हा ट्रॅक्टर गडबोरी  रेती घाटाचा रोडवर  पकडला ट्रॅक्टर मध्ये रेती भरलेले असून हा ट्रॅक्टर सौरव किशोर  प्यारमवार राहणार एकता चौक सिंदेवाही यांची असून या ट्रॅक्टर  मालकावर रेती वाहतूक केल्याप्रकरणी गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी 1लाख 10हजार 900 रुपये  दंड ठोकला आहे. तसेच दुसरी ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34  AB- 21 91 असून ते ट्रक्टर रेती भरून  रामाळा
वरून गडबोरी कडे जात असताना. तहसीलदार जगदाळे यांनी पकडले व ते तहसील कार्यालया समोर आवारात लावण्यास सांगितले असून हे ट्रॅक्टर उसगावकर रा. गडबोरी यांच्या मालकीची असून या ट्रॅक्टर मध्ये रेती भरलेले  आढळले त्यामुळे  गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर मालकावर 1 लाख 10 हजार 900 रुपये दंड ठोकला असून हे दोन्ही ट्रॅक्टर तहसील मध्ये जप्त केले आहे. ही कारवाई सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे यांनी केले आहे.
खबरबातने प्रकाशित केलेले वृत्त 

सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीवर रेतीतस्करांचा धुमाकूळ, तहसील प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष