नवनियुक्त पोलीस आयुक्त राज्यपालांच्या भेटीला; परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ मार्च २०२१

नवनियुक्त पोलीस आयुक्त राज्यपालांच्या भेटीला; परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धावमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा अशी आग्रही मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यासाठी भाजपाचे शिष्टमंडळ 24 मार्चला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला जाणार आहे. त्यातच मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी राज्यपालांची भेट घेतली आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी यासाठी परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

सचिन वाझे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरणातून पुढे वेगळेच वळण मिळाले आहे. सचिन वाझेंची नियुक्ती कोणी केली ते मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्तांची अक्ष्यम्य चुकांमुळे उचलबांगडी या साऱ्या प्रकरणांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. 

राज्याचा राजकारणात शनिवारी रात्री भूकंप आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर गंभीर आरोप असलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले होते. यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला देशमुखांनी मुंबईतील पब, बार आदी आस्थापनांकडून महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे काम दिले होते. गृहमंत्री पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे परमबीर यांनी मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवारांना सांगितले होते, असा आरोप केला होता.

परमबीर सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठऊन त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.  सिंग यांची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी याचिका दाखल केली आहे. 

#मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त #हेमंत_नगराळे यांनी आज #राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतरची हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती.

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे  संसदेच्या दोन्ही सभागृहात तीव्र पडसाद, राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब.

खंडणीप्रकरणी देशमुखांची चौकशी करून गुन्हा दाखल करा; भातखळकरांची पोलीस ठाण्यात तक्रार