सेवावर्ती नामदेव राऊतांचे कार्य युवकांना प्रोत्साहित करणारे - हंसराज अहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ मार्च २०२१

सेवावर्ती नामदेव राऊतांचे कार्य युवकांना प्रोत्साहित करणारे - हंसराज अहीर

सेवावर्ती नामदेव राऊतांचे कार्य युवकांना प्रोत्साहित करणारे - हंसराज अहीर
चंद्रपूर:- पर्यावरणपुरक राष्ट्राची स्वप्नपूर्ती, पर्यावरणाचे संरक्षण व जतन, आरोग्य संवर्धन ग्रीन भारत-स्वस्थ व स्वच्ठ भारत ही संकल्पना साकार करण्याचा संदेश देण्यासाठी 59 वर्षीय सेवावर्ती नामदेव राऊत व त्यांच्या सहकार्यांनी तब्बल 26 दिवस सात राज्यातुन सलग 4100 कि.मी. सायकलने प्रवास करून मोलाचे कार्य केले असुन त्यांच्या या कार्यसिध्दीने युवा पिढीस प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
श्री जगनगुरू व्यायामशाळेच्या वतीने दि. 01 मार्च 2021 रोजी आयोजित सत्कार सोहळ्यास मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या व्यायामशाळेच्या माध्यमातून अनेक युवकांनी  कुस्तीबरोबरच विविध क्षेत्रात नावलौकीक संपादन केला आहे त्या कळीतील नामदेव राऊत हे एक यशस्वी व्यक्तीमत्व आहेत. बालपनापासुन कुस्ती व जलतरण क्षेत्रात त्यांनी लौकीक संपादन केला. आता निवृत्ती पश्चात समाज व राष्ट्र कार्यात योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगीतले. व्दारका ते इटानगर (गुजरात ते अरूणाचल प्रदेश) हा त्यांचा सायकल प्रवास युवकांबरोबरच ज्येष्ठ नागरीकांना सदैव प्रेरक ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
याप्रसंगी हंसराज अहीर यांचे शुभहस्ते नामदेव राऊत यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून ह्दय सत्कार करण्यात आला. जिल्हा कुस्तीगिर संघातर्फे नुकतीच जगनगुरू व्यायामशाळेतील 15 युवक युवतींची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाल्याने या युवा खेळाडुंचे तसेच व्यायामशाळेचे सहसचिव धर्मशिल काटकर व सुहास बनकर यांचाही सत्कार पार पडला.
आपल्या सत्कार प्रसंगी नामदेव राऊत यांनी 26 दिवसांच्या सायकल प्रवसंाचे अनुभव कथन करून हा प्रवास सार्थकी ठरल्याचे सांगीतले या प्रवासात त्यांच्या समवेत असलेल्या कॅप्टन रविंद्र तरारे, हैद्राबादचे विजय भास्कर रेड्डी, नागपूरचे संजय वैद्य, श्रीकांत उके, प्रकाश देशपांडे आदिंनी सहभाग घेतला होता. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, व अरूणाचल प्रदेश या सात राज्यातुन या सायकल वीरांनी या यात्रेतून हरीत भारत, स्वस्थ भारत  हा नारा देत आपले उद्दीष्ट सफल केले. यावेळी श्री राऊत यांनी क्रिडा भारतीच्या संपर्क आणि प्रेरणेतून हे साध्य झाल्याचे सांगीतले. तत्पूर्वी हंसराज अहीर यांनी जगनगुरू आखाडा परिसरातील श्री हनुमान यांच्या मुर्तीचे विधीवत पुजन केले. या कार्यक्रमास मंचावर माजी उपमहापौर  अनील फुलझेले, राजु घरोटे, युवा नेते रघुवीर अहीर, राहुल गायकवाड, चेतन शर्मा आदी प्रभृतींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन विवेक बुरडकर यांनी तर आभार प्रदर्शन शाम राजुरकर यांनी केले.