ग्रामीण रुग्णालय नवेगावबांधला उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या -उपसरपंच रघुनाथ लांजेवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ मार्च २०२१

ग्रामीण रुग्णालय नवेगावबांधला उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या -उपसरपंच रघुनाथ लांजेवार

ग्रामीण रुग्णालय नवेगावबांधला उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या -उपसरपंच रघुनाथ लांजेवारआरोग्य शिबिरात 536 रुग्णांची तपासणी.संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.7 मार्च:-

ग्रामीण रुग्णालय नवेगावबांधला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी रुग्ण कल्याण समिती सदस्य रघुनाथ लांजेवार यांनी केली ते ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथील विनामूल्य दंत व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.एमएच अंतर्गत दिनांक 4 मार्च ते 7 मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे भव्य रोग निदान शिबीर व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन पार पडले. सदर शिबिरामध्ये एकंदर 536 रुग्णांनी नोंदणी करून शिबिराचा लाभ घेतला यामध्ये हायड्रोसिल व हर्नियाचे 65 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली, 86 दंत रुग्ण तपासणी व उपचार तसेच बारा रुग्णांच्या शरीरावरील लहान गाठींचे शस्त्रक्रिया करण्यात आली ,त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी दिनांक सात मार्चला 36 रुग्णांची सोनोग्राफी करण्यात आली .
सदर शिबिराचे उद्घाटन सरपंच अनिरुद्ध शहारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या हस्ते आरोग्य देवता धन्वंतरीचे फोटोचे पुजन व द्विप प्रज्वलन करून संपन्न झाले .याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नवेगावबांधचे उपसरपंच तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य रघुनाथ लांजेवार,रुग्ण कल्याण समिती सदस्य सतीश कोसरकर, विलास कापगते बाबूलाल नेवारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक घुमनखेडे ,डॉ. नेहा मदने, डॉ. रुपेश कापगते, डॉ. महेश लोथे, डॉ. श्याम भोयर,डाॅ. लोकेश वाढिवा ,डॉ.कुकडे ,डॉ. गायत्री गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे अपंग रूग्ण नोंदणी व प्रमाणपत्र वितरणाचा शिबीर लावण्यात यावा अशी मागणी या प्रसंगी रुग्ण कल्याण समिती सदस्य सतीश कोसरकर यांनी केली .ज्यांचे आरोग्य चांगले तोच जिवंत माणूस असतो ,सुदृढ व्यक्ती सदैव सकारात्मक असतात व त्यांच्यामुळे देशाला चांगले नागरिक मिळून देशाचा विकास होतो असे मत उद्घाटक डॉ. अमरीश मोहबे यांनी याप्रसंगी व्यक्त केले . ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध च्या सर्व डॉक्टर मंडळींनी कोरोणा काळात उत्तम सेवा दिली असे गौरव गौरवोद्गार अध्यक्षीय भाषणामध्ये अनिरुद्ध शहरे यांनी व्यक्त करून सदर शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांच्या अपेक्षा पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला . ग्रामीण क्षेत्रातील शेवटच्या रुग्णापर्यंत रुग्ण सेवा पोचावी या उद्देशाने मागील चार वर्षापासून शिबिराचे आयोजन सुरू करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक धुमनखेडे यांनी प्रास्ताविकातून दिली, उद्घाटन प्रसंगी संचालन संजय रेवतकर यांनी तर डॉ. महेश लोथे यांनी आभार मानले,शिबिरांचे यशस्वीतेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर व गोंदिया येथील तज्ञ डॉक्टर मंडळींनी तसेच ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध चे सर्व कर्मचारी वृंद यांनी विशेष सहकार्य दिले.