बुद्धिबळ खेळाडू व प्रशिक्षकांना सुवर्णसंधी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ मार्च २०२१

बुद्धिबळ खेळाडू व प्रशिक्षकांना सुवर्णसंधी

बुद्धिबळ खेळाडू व प्रशिक्षकांना सुवर्णसंधी


 अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेमार्फत बुद्धिबळ खेळाडू व प्रशिक्षकांना प्रशिक्षकाची पदवी व प्रमाणपत्र प्रदान करणेसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन 

 अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेमार्फत बुद्धिबळ खेळाडूंना व प्रशिक्षकांना प्रशिक्षकाची पदवी व प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे आयोजन केले आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात व तळागाळात दर्जेदार खेळाडू निर्माण करून बुद्धिबळाचा विकास व प्रसार करणेचा उद्देश आहे. या प्रशिक्षण उपक्रमामध्ये बिगर गुणांकन प्राप्त सहभागी बुद्धिबळ खेळाडूसाठी पाच दिवस (२५-३० तास प्रशिक्षण) व गुणांकन प्राप्त सहभागी बुद्धिबळ खेळाडूसाठी तीन दिवस (१५ तास प्रशिक्षण) साठी आहे.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गुणांकन प्राप्त बुद्धिबळ खेळाडूसाठी एक हजार रूपये व बिगर गुणांकन प्राप्त बुद्धिबळ खेळाडू साठी पंधराशे रुपये प्रवेश शुल्क आहे. सदर रक्कम महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या खात्यात जमा करावी. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीनी व प्रशिक्षकांनी बुद्धिबळाच्या विकासासाठी चेस इन स्कूल उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील तळागळातील शाळांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या उपक्रमात सहभागी व्हावे. सदर बुद्धिबळ प्रशिक्षण कार्यक्रम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे.मर्यादित प्रवेश असल्याने इच्छुकांनी आपली नावे ४ मार्च पर्यंत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या ई-मेलवर maharashtrachessassociation@gmail.com वर प्रवेशिका भरून नोंदवावीत व अधिक माहितीसाठी विलास म्हात्रे ८८८८०११४११ भरत चौगुले ९८५०६५३१६० प्रवीण ठाकरे ९२२६३७५०७७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे मुख्य आश्रयदाते अशोकभाऊ जैन, अध्यक्ष सिद्धार्थ मयूर व सचिव निरंजन गोडबोले व चंद्रपूर क्रिएटिव्ह चेस असोसिएशनचे अध्यक्ष अश्विन मुसळे यांनी पत्राद्वारे केली आहे