मोटेगाव येथील भीषण आगीत चार घरे खाक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मार्च २०२१

मोटेगाव येथील भीषण आगीत चार घरे खाकघरातील उपयोगी वस्तू जळल्याने लाखोंचे नुकसान


चिमूर, ता. 31 : तालुक्यातील मोटेगाव येथे बुधवारी अचानक आग लागल्याने चार घरे खाक झाली. बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास गावालगत असलेल्या शेतात आग लागली. काही क्षणातच आगीने शेतालगत असलेल्या घरांना वेढा घातला. आग लागल्याचे लक्षात येताच गावातील नागरिकांनी चिमूर अग्निशमन विभागाला सूचना केली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या एका बंबाने आग विझविण्यात आली.


आगीत प्रकाश बापूराव नेवारे, मंगेश बापूराव नेवारे, सुधाकर शेंडे आणि बापू अडसोडे यांची घरे जळून खाक झाली आहेत. तसेच आगीत घरे आणि संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने या नागरिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप कळले नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.