हिंस्र वन्यप्राण्याचा वावर थांबविण्यासाठी पठाणपुरागेटबाहेर वेकोलिने स्वच्छता करावी : बंङू धोतरे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ मार्च २०२१

हिंस्र वन्यप्राण्याचा वावर थांबविण्यासाठी पठाणपुरागेटबाहेर वेकोलिने स्वच्छता करावी : बंङू धोतरे
जमनजट्टी, माना-लालपेठ परिसर परिसर वन्यप्राणीमुक्त करा

मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांची मागणी


चंद्रपूर/ प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून माना-लालपेठ परिसरात अस्वलीचा वावर सुरू आहे. पठाणपुरा गेटबाहेर या वेकोलिच्या ओवरबर्डन परिसरातील झाङेझुङपे तातङीने काढण्याची मागणी अशी मागणी विभागीय वनाधिकारी सारिका जगताप यांच्याकडे इकोप्रोचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंङू धोतरे यांनी केली आहे.

पठाणपुरा गेटबाहेर जमनजट्टी परिसरात सकाळी मॉर्निंग वॉककरिता नागरिक येत असतात. याच वेकोलीच्या ओव्हर बर्डनवर 2013 मध्ये तीन बिबट पकडण्यात आलेले आहे. मागील वर्षभरात माना परिसरात वाघाचा वावर सुद्धा दिसून आलेला आहे.परिसरात वाढलेले काटेरी बाभळीचे झुडूप कारणीभूत ठरत आहेत. बाबळीचे कत्रिम जंगल तयार झाले आहे. वेकोलिकडून दरवर्षी सदर परिसर स्वच्छ करण्याची गरज असताना, रोड च्या दुतर्फा कायम स्वच्छता ठेवणे गरजेचे असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे. येथे वन्यप्राणी वावर असल्याने याकडे सतत देण्याची लक्ष आहे. वनविभागाच्या वतीने त्वरित कार्यवाही करीत वेकोली कडून स्वछता आणि झुडुपे काढण्याची कामे करवून घ्यावी, अशी मागणी इको प्रोचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंङू धोतरे यांनी विभागीय वनाधिकारी सारिका जगताप यांच्याशी चर्चा करताना केली.

दरम्यान आज सुनील लेनगुरे नामक व्यक्ती अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाला. इकोप्रोच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाणून प्रकृतीची विचारपूस केली. सदर जखमी व्यक्तीचा वैद्यकीय सल्ल्यानुसार चेहरा विद्रूप झाला असल्यास त्वरित प्लास्टिक सर्जरी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे.अशा घटनांवर आळा घालण्यासाठी विविध बैठकीत सूचना देऊन कार्यवाही होत नसल्याची टीका मानद वन्यजीव रक्षक धोतरे यांनी केली आहे. अगदी पहाटे पठाणपुराबाहेर कुणीच फिरायला सध्या परिस्थितीत जाऊ नये, स्वतःची सुरक्षा लक्षात घेऊन परिसर स्वच्छ होईस्तोवर परिसरात मॉर्निंग वॉक करू, नये असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी केले आहे.