गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ राजेंद्र कुमार शर्मा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२३ मार्च २०२१

गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ राजेंद्र कुमार शर्मा

आयआयटी दिल्ली येथील गणिताचे प्राध्यापक डॉ राजेंद्र कुमार शर्मा  कुलगुरूपदी 

दिल्ली आयआयटी येथे दीर्घ काळ गणिताचे प्राध्यापक असलेले तसेच सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासन पद धारण करीत असलेल्या डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांच्या नियुक्तीची घोषणा केली. 


दिनांक  ७ सप्टेंबर २०२० रोजी गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. 

 

डॉ राजेंद्र कुमार शर्मा (जन्म २० नोव्हेंबर १९५८) यांनी मेरठ विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून आयआयटी दिल्ली येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांनी फ्रांस व जर्मनी येथे पोस्ट डॉक्टरल शिक्षण प्राप्त केले आहे. डॉ. शर्मा यांनी आयआयटी खडकपूर येथे अध्यापनाला सुरुवात केली व सन २००२ पासून ते दिल्ली आयआयटी येथे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. 


दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी त्यांची स्वित्झर्लंड येथे कन्सेनसिस ब्लॉकचेन या संशोधन अध्यासनावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना अध्यापनाचा ३२ वर्षांचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली आहे. 

 

कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी पाटणा व दिल्ली उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती  न्या. राजेंद्र मेनन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति गठित केली होती. इंडियन इंस्टीट्युट ऑफ सोशल एंड इकोनोमिक चेंज, बंगलोर येथील संचालक डॉ. एस माधेश्वरन व शासनाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर या समितीचे सदस्य होते.  समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ राजेंद्र कुमार शर्मा यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली. 

 (डॉ. राजेंद्र कुमार शर्मा, ०९०१३६४३१०६)

Dr Rajendra Kumar Sharma to be new Vice Chancellor of Gondwana University


The Governor of Maharashtra and Chancellor of Universities in the State Bhagat Singh Koshyari has appointed Dr Rajendra Kumar Sharma as the Vice Chancellor of the Gondwana University at Gadchiroli.

Dr Sharma who holds a Research Chair Professorship instituted by ConsenSys AG, Switzerland has served as Professor and former Head of the Department of Mathematics at IIT Delhi.  

Dr Sharma succeeds Dr Namdev Kalyankar whose term expired on 7 September 2020.  Prof Shrinivasa Varakhedi, Vice Chancellor of Kavikulaguru Kalidasa Sanskrit University Ramtek was holding the additional charge as the Vice Chancellor of the Gondwana University.

Dr Rajendra Kumar Sharma (b. 20 November 1958) obtained his Post Graduate degree from Meerut University and Ph D from IIT Delhi. He has served as Lecturer at IIT Kharagpur and has been serving as Professor at Delhi IIT from 2002.  Dr Sharma has a research / teaching experience of 32 years. He has guided 32 Ph D theses and more than 78 M Tech projects.


The Governor had appointed a Search Committee under Justice Rajendra Menon, retired Chief Justice of Patna and Delhi High Courts to recommend to him a panel of names for the appointment of Vice Chancellor of the University. Prof S Madheswaran, Director, Institute for Social and Economic Change, Bangalore and Milind Mhaiskar, Principal Secretary to the Government were members of the Committee. The Governor interviewed all the candidates recommended by the Committee and announced the name of Dr Sharma. 

(Dr Sharma, 09013643106)