DoctorOfLiterature : शंकरबाबा पापळकर यांना मिळणार डि.लीट मानद पदवी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ मार्च २०२१

DoctorOfLiterature : शंकरबाबा पापळकर यांना मिळणार डि.लीट मानद पदवी
संत गाडगे बाबा #अमरावती विद्यापीठाची अधिसभा कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे अध्यक्षतेखाली आज आभासी पध्दतीने संपन्न झाली. या सभेत वझ्झर, अचलपूर येथील स्व . अंबादासपंत वैद्य दिव्यांग अनाथालयाचे शंकरबाबा पापळकर यांची डि.लीट मानद पदवीकरिता एकमताने निवड करण्यात आली.
#विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने समाजकार्यामध्ये बहुमूल्य योगदान देणारे श्री शंकरबाबा पापळकर यांना विद्यापीठाची मानद डि.लीट. देण्याचा निर्णय घेतला होता.
संपन्न होणा­या 37 व्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांना ससन्मान डि.लीट मानद पदवी प्रदान केल्या जाणार आहे.
#DoctorOfLiterature