नागपूरच्या समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ मार्च २०२१

नागपूरच्या समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेनागपूरच्या समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

            मुंबईदि. 3 : नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल. या प्रकरणी प्रथम दर्शनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईलअसे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

            सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे म्हणाले कीया संस्थेमार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त जे कार्यक्रम घेण्यात आले त्याच्या खर्चामध्ये ताळमेळ लागत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत केली जाईलअसेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससदस्य सर्वश्री नाना पटोलेसुधीर मुनगंटीवार यांनी भाग घेतला.