राऊत साहेब, उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा : भाजपा नेते धर्मपाल मेश्राम यांचा उर्जामंत्र्यांना टोला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२० मार्च २०२१

राऊत साहेब, उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा : भाजपा नेते धर्मपाल मेश्राम यांचा उर्जामंत्र्यांना टोला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या खिशातून पैसा खर्च करून उच्च राहणीमान ठेवावेत्यासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नयेअसा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी लगावला आहे.

ऊर्जामंत्री राऊत यांनी अलीकडेच आपल्याला उच्च राहणीमान आवडत असल्याचे वक्तव्य केले होते.त्या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. मेश्राम यांनी म्हटले आहे कीराऊत यांना उच्च राहणीमान आवडत असेल तर त्याला कोणाची हरकत असणार नाही. मात्र त्यासाठी त्यांनी  स्वत:चा पैसा खर्च करावाजनतेचा नाही. मंत्रिपद हे काही हौस-मौज पूर्ण करण्यासाठी दिलेले पद नाही तर ती एक जबाबदारी आहे. गरिब शेतकरी आणि सामान्य जनता काळोखात असताना ऊर्जामंत्र्यांना हा झगमगाट शोभतो का याचा तरी विचार करा असा सवालही श्री. मेश्राम यांनी या पत्रकातून उपस्थित केला आहे.

 एकीकडे ऊर्जा कंपन्या आर्थिक संकटात असल्याचे कारण देत राज्यातील शेतकरी आणि सामान्य वीज ग्राहकांना वेठीस धरून सक्तीची वीज वसूली केली जात आहे. तर दुसरीकडे ऊर्जामंत्री जनतेच्या जीवावर उच्च राहणीमानात रहात आहेत. आपल्याला जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले आहेजनतेच्या पैशावर मौज करण्यासाठी नाही हे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ध्यानात घ्यावे. उच्च राहणीमान एवढं  आवडत असेल तर त्यासाठी स्वत:चा पैसा खर्च करावाजनतेचा नाही. वैयक्तिक कामासाठी विमानाने फिरल्यावर त्याची बिले देण्याची सुद्धा तयारी असावी. ती बिलं भरण्यासाठी सरकारी कंपन्यांना  दबाव टाकू नयेअसंही श्री.मेश्राम यांनी नमूद केले आहे.

श्री. मेश्राम म्हणाले की100 युनीट पर्यंतची वीज बिलं माफ करण्याच्या आश्वासनाची पूर्ती करण्याची वेळ येते तेव्हा जोपर्यंत ऊर्जा कंपन्याचा तोटा भरून निघत नाही तोपर्यंत 100 युनिटपर्यंत मोफत वीज शक्य नाही असे म्हणून स्वत:च्याच भूमिकेवरून पाठ फिरवतात. कोरोना काळातील अवाजवी बिलं माफ करण्याचे आश्वासनही पोकळ निघाले. या ग्राहकांना अवाजवी बिलंही दुरूस्तही करून दिली नाहीत. आता तर सक्तीची वीज बिलं वसूली करत वीज जोडणी कापली जाते आहे. पण ऊर्जामंत्र्याच्या वैयक्तिक विमान प्रवासासाठी आलिशान कार्यालय आणि शासकीय निवासासाठी मात्र ऊर्जाखात्याच्या कंपन्यांकडे पैसाच पैसा आहे.

जनतेला काळोखात ठेवून जनतेच्याच जीवावर उच्च राहणीमानात राहण्याची चंगळ  करणाऱ्या नितीन राऊत यांना यासाठी मंत्रीपद दिले आहे का याचे उत्तर महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वाने जनतेला द्यायलाच हवे अशी मागणी मेश्राम यांनी पत्रकात केली आहे.