६ लाख ७२ हजार लाभार्थ्यांना दुसरी मात्राही दिली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२५ मार्च २०२१

६ लाख ७२ हजार लाभार्थ्यांना दुसरी मात्राही दिली

 राज्यात आतापर्यंत #कोविडप्रतिबंधकलशीच्या ५० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. लसीकरणाचा हा टप्पा ओलांडणारं, महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. ४३ लाख ४२ हजार लाभार्थ्यांना लशीची पहिली मात्रा दिली असून, ६ लाख ७२ हजार लाभार्थ्यांना दुसरी मात्राही दिली आहे.

देशात #कोविड19 चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक २८ शतांश टक्के झाला आहे. काल २६ हजारापेक्षा जास्त रूग्ण बरे झाले. सध्या देशभरात सुमारे ३ लाख ९५ हजार सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. देशात काल ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली. काल २५१ रूग्णांचा मृत्यू झाला.