कोविड-१९ नियमाचे पालन न करणाऱ्यांवर एका दिवसाच्या दंडात्मक कारवाईत १,२२,००० रु. दंड वसूल Corona - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ मार्च २०२१

कोविड-१९ नियमाचे पालन न करणाऱ्यांवर एका दिवसाच्या दंडात्मक कारवाईत १,२२,००० रु. दंड वसूल Corona


वरोरा तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी) :
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर वाढणारी रुग्ण संख्या नियंत्रित करण्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये मास्क, सामाजिक अंतर याबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी वरोरा तालुका प्रशासनाने वरोरा शहरात कारवाईचे नियोजन केले होते. सदर कारवाई मध्ये ६ पथके तयार करून कोविड-१९ च्या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापना व कार्यालये यांची माहिती संकलित करण्यात आली. त्यांची छायाचित्रे संकलित करण्यात आली. याबाबतीत पूर्ण गोपनीयता पाळण्यात आल्याने एका बाजूने कारवाई सुरू झाली की पुढील दुकाने नियमांचे पालन करीत असल्याचा दिखावा करतात ते करणे शक्य झाले नाही. अशा एकूण ५६ आस्थापना व दुकाने यांचेवर कारवाई करण्यात आली. त्यांचेकडून एकूण १,१०,००० रुपये दंड एका दिवसात वसूल करण्यात आला. तसेच एक पेट्रोल पंप व २ मंगल कार्यालये यांचेवर देखील कारवाई करीत १२,००० रुपये दंड वसूल करण्यात आला. यात एकूण दंड १,२२,००० रु.वसूल करण्यात आला.
सदर कारवाई चा मुख्य उद्देश हा दंड वसूल करणे नसून नागरिकांमध्ये नियम पालनाबाबत गांभीर्य निर्माण करणे हे आहे. सर्व नागरिकाने या नियमांचे कटाक्षाने पालन करून स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करावे असे आवाहन तालुका प्रशासन वरोरा कडून याद्वारे केले जात आहे. सदर कारवाईचे पूर्ण नियोजन व अमलबजावणी वरोराचे तहसीलदार बेडसे पाटील यांच्या मार्गदशनाखाली नायब तहसीलदार मधुकर काळे व सलामे यांनी केले. सर्व मंडळ अधिकारी पथक प्रमुख म्हणून कार्यरत होते. पथकामध्ये नगर पालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.