पाचशे कोरोना योद्धाचा प्रश्न निकाली लागणार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, मार्च ०९, २०२१

पाचशे कोरोना योद्धाचा प्रश्न निकाली लागणार

पाचशे कोरोना योद्धाचा  प्रश्न निकाली लागणार


आमदार प्रतिभाताई धानोरकराची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी सकारात्मक चर्चा 


चंद्रपूर : चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयातील पाचशे कंत्राटी कामगारांना सात, आठ महिन्याचे थकीत पगार व किमान वेतन त्वरित द्या अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली. हा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

            कंत्राटी कामगारांना सात, आठ महिन्याचे थकीत पगार व किमान वेतन मिळालेले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आहे आहे. कंत्राटी सेवा पुरविण्याच्या कामाचे कंत्राट ५ मार्च २०२० रोजी शासनाने रद्द केल्यानंतर निविदा प्रक्रियेतील इतर कंत्राटदारांना काम घेण्याबाबत चर्चेसाठी बोलवण्याचे किंवा नवीन निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्याची कारवाई करणे आवश्यक असताना अधिष्ठाता कार्यालयाने जाणीवपूर्वक दिरंगाई करून सर्व कंत्राटी कामगारांना रोजंदारीवर कार्यात ठेवल्याने कंत्राटी कामगारांचे वेतन देण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. या कंत्राटी कामगारांच्या खात्यावर थेट पगार जमा करण्याचे लेखी निर्देश जिल्हाधिकारी यांनी देऊनही त्यांची अमलबजावणी करण्यासाठी अधिष्ठाता कार्यालय व वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शासन स्तरावर याबाबत निणय लवकर घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

आठ महिन्याचा थकीत पगार व दोन वर्षांपूवी शासनाने मंजूर केलेले किमान वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी या कामगारांनी कुटुंबासह दि. ८ फेबूरवारी चंद्रपूर जिलाधिकारी कार्यालय समोर डेरा आंदोलन सुरु आहे. हि मागणी लवकर पूर्ण करून या महिलांना होणार त्रास दूर करावा तसेच हे आंदोलन लवकरच मागे घेण्यासाठी मागण्या पूर्ण कार्च्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना केली. हा प्रश्न त्वरित निकाली कडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.