आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली कोरोना लस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मार्च २०२१

आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली कोरोना लस

 आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली कोरोना लस        चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शुक्रवारी कोरोना लस घेतली. नागरिकांनीही लस घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहण यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डाॅ. अविष्कार खंडारेडाॅ. नयना उत्तरवारडाॅ. देवयानी भुतेडाॅ. शुभांगी मुनघाटे,  रविना ताजनेसरिता लोखंडेशामल रामटेकेछाया अरकेअंजू गायकवाड उपस्थिती होते. चंद्रपूर जिल्ह्यात मध्यंतरी आटोक्यात आलेला कोरोना आता हळूहळू पुन्हा हात पाय पसरत आहे. त्यामूळे नागरिकांनी मास्क चा वापर करावा, तसेच गर्दी न करता सर्तक राहण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे. चंद्रपूरात व्याधीग्रस्त ४५ वर्षावरील नागरिकांसाठी तसेच ६० वर्षावरील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने मोफत कोरोना लस दिल्या जात आहे. यासाठी लसीकरण केंद्र तयार करण्यात आले असून नोंदनी केलेल्या नागरिकांना लस दिल्या जात आहे. दरम्याण आज आमदार जोरगेवार यांनी तुकुम येथील कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोनाचा पहिला डोस घेतला. यावेळी लस सुरक्षीत असून नागरिकांनीही ही लस घेण्यासाठी पूढाकार घेण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.