अर्जुनी मोरगाव तालुक्यात वाढली कोरोनाची चिंता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१९ मार्च २०२१

अर्जुनी मोरगाव तालुक्यात वाढली कोरोनाची चिंता

 अर्जुनी मोरगाव तालुक्यात वाढली कोरोनाची  चिंतागूढरीत आढळला कोरोना पॉझिटिव


 चान्ना  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूने केली नागरिकांची तपासणी.
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.18 मार्च:-


गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गुढरी येथे कोरोना पॉझिटिव व्यक्ती आढळल्याने, अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवून, कोरोना हळू हळू तालुक्‍यात पाय तर पसरणार नाही ना? याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे .गुढरी गावातील नागरिकांची कोरोना तपासणी आज दिनांक 18 मार्च रोज गुरुवारला गावात करण्यात आली. ही तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाकटी च्या वैद्यकीय चमूनेकेली. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता डोंगरवार, डॉ. नाकाडे , परिचारिका खराबे, काटवले, नंदेश्वर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शहारे यांनी या तपासणी कार्याला सहकार्य केले जिल्ह्याबरोबरच अर्जुनी मोरगाव तालुक्यातही कोरोना हळू हळू पाय पसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाकटी येथे कोरोनाची तपासणी नियमित करण्यात येत आहे. या ठिकाणी नागरिक येऊन आपली निशुल्क तपासणी करू शकतात. त्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीकरण देखील सुरू झाले आहे. साठ वर्षे वर वय असलेल्या तसेच 45 ते 59 वर्षे वयाच्या जोखीम असलेल्या नागरिकांनी याचा लाभ  नागरिकांनी घ्यावे. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध घालता येईल व नागरिकांना आपले आरोग्य सुरक्षित करता येईल. अशी माहिती डॉ. डोंगरवार यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी सतर्क होऊन कोरोना पासून दूर राहण्याचे व मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, हात वारंवार साबणाने धुणे,सॅनी टायझर वापरणे या गोष्टीकडे लक्ष देण्याचे आव्हान डॉ. श्वेता डोंगरवार यांनी केले आहे.