नवेगावबांध येथे शिवाजी चौकात धर्मार्थ प्याऊचे लोकार्पण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ मार्च २०२१

नवेगावबांध येथे शिवाजी चौकात धर्मार्थ प्याऊचे लोकार्पण

 नवेगावबांध येथे शिवाजी चौकात धर्मार्थ प्याऊचे लोकार्पण

  

पर्यटक व भाविकांसाठी थंडपाण्याची व्यवस्था

   संजीव बडोले प्रतिनिधी.       


नवेगावबांध दि.11 मार्च:-


येथील शिवाजी चौकात येणाऱ्या-जाणाऱ्या  प्रवाशांसाठी तसेच पर्यटकांसाठी महत्वाचे थांबण्याचे ठिकाण असून, उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच दरवर्षीच सुजल सामाजिक बहुउद्देशीय संस्था व मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नवेगावबांध शिवाजी चौकामध्ये पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था केली जाते. या वर्षीही महाशिवरात्रीचे औचित्य साधून मित्रपरिवार व सुजल  सामाजिक सेवा समिती यांनी पिण्याकरिता थंड पिण्याच्या पाण्याचे प्याऊची व्यवस्था केली आहे. त्याचे लोकार्पण आज दि.11 मार्च रोज गुरुवारला करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे,नवेगावबांध ग्रामपंचायतीचे  सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार ,खरेदी-विक्रीचे संचालक केवलराम पुस्तोडे ,उपसरपंच देवळगाव होमराज पुस्तोडे कान्होली चे सरपंच संजय खरवडे, सुजल समितीचे सचिव कालिदास पुस्तोडे, उद्योगपती नवल चांडक, विजय संग्रामे,  सेवकदास मेश्राम, मदन बावनकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.