अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो मुख्यमंत्र्यांना ऐकायला जात नाही - चंद्रकांतदादा पाटील - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२७ मार्च २०२१

अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो मुख्यमंत्र्यांना ऐकायला जात नाही - चंद्रकांतदादा पाटील

 अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो मुख्यमंत्र्यांना ऐकायला जात नाही

भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

 


छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो ऐकायला जात नाहीअशी परखड टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत पनवेल येथे बोलताना केली.

मा. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत आज उरणपनवेल आणि खारघर याठिकाणी शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठका पार पडल्या. यावेळी माजी खासदार ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूरयुवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटीलरायगड भाजपा जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूरआ. महेश बालदीपनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमलप्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्य बाळासाहेब पाटीलप्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनंद पटवर्धनजिल्‍हा संघटन सरचिटणीस अविनाश सोनीजिल्हा सरचिटणीस दीपक बेहरेजिल्हा सरचिटणीस विनोद साबळेयुवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर उपस्थित होते.

ते म्हणाले कीराज्यात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होत आहेत. नुकतेच मेळघाटामध्ये एका महिला वनाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याला कोण जबाबदार आहेमहाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. संवेदना नसलेल्या या भ्रष्ट सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाहीअसेही ते म्हणाले. या सरकारचे भीषण स्वरूप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचवले पाहिजेअशी सूचना त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था तर न घर का न घाट का’, अशी झाली आहेअसा टोला त्यांनी हाणला.