मनपात समता दिन साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मार्च २०२१

मनपात समता दिन साजरा

मनपात समता दिन साजरादिनांक १२ मार्च, २०२१ रोजी भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चौव्हाण यांच्या जन्मदिवस "समता दिन" म्हणून चंद्रपूर  शहर महानगरपालिका, चंद्रपूर मध्ये त्यांची जयंती साजरी करून मा. महापौर  राखी संजय कंचर्लावार यांचे हस्ते त्यांची प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना करण्यात आली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून मा. यशवंतराव चौव्हाण ओळखले जातात. आज त्यांची जयंती निमित्य पालिकेत विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मनपाच्या स्थायी समिती सभापती श्री. रवी आसवानी, उपायुक्त श्री. अशोक गराटे, श्री. सुरेश माडवे, श्री. सचिन माकोडे, श्री. विकास दानव, श्री. अनिल बनकर, श्री. गुरुदास नवले, श्रीमती खनके व मनपातील कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.