ब्रह्मपुरीत चोरीच्या 9 मोटर सायकल जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या


२३ मार्च २०२१

ब्रह्मपुरीत चोरीच्या 9 मोटर सायकल जप्तदुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला ब्रम्हपुरी पोलिसांनी केली अटक - चोरीतील 9 दुचाकी जप्तदुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला ब्रम्हपुरी पोलिसांनी अटक केली असून चोरीतील 9 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.प्रदीप उर्फ सोनू मेश्राम असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.ब्रम्हपुरी येथील विनोद सहारे यांनी घरासमोरून दुचाकी चोरी गेल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती.त्यानंतर ब्रम्हपुरी पोलिसांचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असतांना चोरीतील दुचाकी एका शेतशिवारात लपवून ठेवल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून सचिन उर्फ बादशहा नगराळे याला ताब्यात घेतले.यावेळी प्रदीप उर्फ सोनू मेश्राम याने दुचाकी चोरी करून विकण्यासाठी येथे आणून ठेवल्याचे सांगितले.पोलिसांनी प्रदीप उर्फ सोनू मेश्राम याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली आहे.यावेळी पोलिसांनी त्याच्याजवळून चोरीतील ९ दुचाकी जप्त केल्या आहेत. हि कारवाई पोलीस निरीक्षक मल्लीकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे, डिबी पथकातील पोलीस अंमलदार अमोल गिरडकर, योगेश शिवणकर, संदेश देवगडे, अजय कटाईत, मुकेश गजबे, विजय मैंद, नरेश कोडापे, शुभांगी शेमले यांनी कारवाई केलेली आहे.