दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला ब्रम्हपुरी पोलिसांनी केली अटक - चोरीतील पाच दुचाकी हस्तगत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० मार्च २०२१

दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला ब्रम्हपुरी पोलिसांनी केली अटक - चोरीतील पाच दुचाकी हस्तगत


 

ब्रम्हपुरी -  दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला ब्रम्हपुरी पोलिसांनी अटक केली असून चोरीतील पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. विकास अजय शर्मा असे आरोपीचे नाव आहे. ब्रम्हपुरी पोलिसांचे पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना एक इसम संशयितरित्या दुचाकी घेऊन फिरताना आढळून आला.त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली आहे.पोलिसांनी विकास अजय शर्मा या आरोपीकडून चोरीतील पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

हि कारवाई पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक उपरे,अरुण पिसे, मुकेश गजबे,अमोल गिरडकर,संदेश देवगडे, अजय कटाइत, विजय मैंद,योगेश शिवणकर,नरेश कोडापे,शुभांगी शेमले,पूजा राऊत आदींनी केली आहे.