चंद्रपूरकरांनो सावधान! कुरकुरे व खारा खाताय; जरा सांभाळून - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२३ मार्च २०२१

चंद्रपूरकरांनो सावधान! कुरकुरे व खारा खाताय; जरा सांभाळून

 
चंद्रपूर शहरातील डम्पिंग यार्ड येथे मुदतबाह्य असलेले कुरकुरे व खारा चे पॉकेट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.मात्र येथे टाकलेले कुरकुरे व खारा चे पॉकेट तेथीलच काही नागरिकांनी उचलून शहरातील प्रकाशनगर वार्डातील दुकानांमध्ये विकण्याच्या तयारीत असतानाच सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडले. व त्यांना रामनगर पोलिसात नेले.त्यानंतर याची माहिती महानगर पालिकेला देण्यात आली.मनपा प्रशासनाने लगेच अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिली.त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे.