डिफेन्स परिसरातुन अवैध दारू जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ मार्च २०२१

डिफेन्स परिसरातुन अवैध दारू जप्त


डिफेन्स परिसरातुन अवैध दारू जप्त
२ लाख ६ हजार८८८ रुपयांचा माल जप्त
नागपूर /अरुण कराळे ( खबरबात )
डिफेन्स पॉवर हाऊस जवळील अमरावती रोड नागपूरकडे येणाऱ्या परिसरात देशी व विदेशी अवैध दारू असलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
प्राप्त पोलीस माहितीच्या सुत्रानुसार गुरुवार ४ मार्च रोजी ९ .१५ वाजताच्या दरम्यान हेड कॉन्स्टेबल सुनील मस्के आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना गुप्त बातमीदारकडून संबंधित घटनेची माहिती मिळताच नमूद घटनास्थळी धाड टाकली असता आरोपी प्रवीण सीताराम धाकरे वय ५१ रा .कारंजा ( घाडगे ) जि. वर्धा यांच्या ताब्यातील अल्टो कार क्रमांक एम .एच.40 ए . ३७२० ची तपासणी केली असता देशी दारू भिंगरी संत्रा न १-१८० च्या एकूण ६२४ नग, ऑफिसर्स चॉईस ब्लू-९६ नग,अल्टो कार अंदाजे किंमत १ लाख ५० हजार रुपये नोकिया कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत १० हजार व नगदी एक हजार असा एकूण २ लाख६ हजार ८८८ रुपयांचा माल जप्त केला.
पोलीस उपआयुक्त नुरुल हसन,वाडीचे ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी याचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक साजिद अहमद,पोलिस हेड कॉन्स्टेबल  सुनील मस्के,पोलीस शिपाई प्रदीप,फईम,नागेश,रितेश,धर्मेंद्र, प्रवीण,प्रमोद, हेमराज,सतीश,ईशवर राठोड पुढील तपास करीत आहे.