भांडण सोडणाऱ्या युवकावर रॉडने हल्ला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३१ मार्च २०२१

भांडण सोडणाऱ्या युवकावर रॉडने हल्ला


भांडण सोडणाऱ्या युवकावर रॉडने हल्ला
आठवा मैल येथील घटना:आरोपींना अटक
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात)
मित्रांचे क्षुल्लक कारणावरून आपसात होत असलेले भांडण सोडविण्यास मध्यस्थी करण्यास गेलेल्या माजी पंचायत समिती सदस्याला रॉडने जबर मारहाण केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
प्राप्त पोलीस माहितीच्या सूत्रानुसार सोमवारी धुलीवंदनाच्या दिवशी माजी पंचायत समीती सदस्य सुधीर आनंदराव करंजीकर वय ३० वर्ष रा. रामजी आंबेडकरनगर , दवलामेटी असे जखमीचे नाव असून आरोपी आकाश रमेश मोवाडे व आरोपी रोशन रमेश मोवाडे रा. दोघेही दवलामेटी यांचे इतर मित्रांसोबत भांडण सुरु होते,दरम्यान सुधीर करंजीकर हे मध्यस्थी करुन वाद सोडविण्यास गेले असता आकाश व रोशनने त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला असता तो गंभीर जखमी झाला वाडी पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन कलम भादवी ३२४, ५०४, ३४ अन्वये घटनेची नोंद करुन आकाश मोवाडे व रोशन मोवाडे यांना ताब्यात घेतले.तर दुसऱ्या घटनेत आकाश रमेश मोवाडे याने अभिषेक ढोके यास तु येथून निघून जा असे म्हटले असता मोनू गायकवाड व गोलू उईके दोन्ही रा. दवलामेटी यांनी आकाश मोवाडे व रमेश मोवाडे यांना रॉडने महारहाण करुन जखमी केले,पोलिसांनी याप्रकरणी भादवी कलम ३२४, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करुन आरोपी मोनू गायकवाड व गोलू उईके यांना अटक केली.अशी माहिती वाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. पुढील तपास वाडी पोलिस करीत आहे.