तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२७ मार्च २०२१

तीन कामगारांचा गुदमरून मृत्यूअंबरनाथ एमआयडीसी मधील आयटीआय परिसरात असलेल्या रासायनिक कंपनीत भुयारी टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू.


अंबरनाथ: रंगकाम करण्यासाठी बोलावलेल्यांना कामगारांना दिले टाकीसफाईचे काम, तिघांचा श्वास गुदमरुन मृत्यू


अंबरनाथ वडोल गाव येथिल एका रासायनिक कंपनीत असलेल्या भयारी रासायनिक टाकीला कलर लावण्यासाठी तीन कामगारांना बोलावण्यात आले होते.


अंबरनाथ मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून तीन जणांना रंगकामासाठी बोलावले होते. मात्र त्यांना तिघांना टाकीसफाईचे काम दिल्याने त्यांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. तर रंगकामासाठी बोलावून टाकी साफ करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.


केमिकलच्या भुमिगत टाक्या साफ करण्यास त्या तिघांना सांगितले. परंतु त्यांना रंगकामासाठी बोलावल्याची आधी सुचना दिली गेली होती. तिघे घटनास्थळी आले असता त्यांना केमिकलच्या टाक्या साफ करायला दिल्या आणि त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीच खबरदारी घेण्यात आली नव्हती.सकाळीच्या सुमारास तिघे कामगार टाकी साफ करण्यासाठी खाली उतरले. त्याचवेळी एकाची तब्येत बिघडल्याने त्यांना औषध आणण्यासाठी एक व्यक्ती गेला. परंतु त्याचवेळी टाकीत श्वास गुदमरुन ते बेशुद्ध झाल्याचे कळले असता त्यांचा मृत्यू झाला. कामासाठी आलेले कामगार हे उत्तर प्रदेशातील राहणारे होते. ठेकेदाराच्या निष्काळजीपणा मुळे तिघांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप लावण्यात येत आहे.