बस स्थानकावर सापडलेला प्रवाशांचा पाकीट पोलिसांनी केला परत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०५ मार्च २०२१

बस स्थानकावर सापडलेला प्रवाशांचा पाकीट पोलिसांनी केला परतचंद्रपूर: येथील बस स्थानक परिसरामध्ये एका प्रवाशाचा पाकीट पडलेला होता. तिथे ड्युटीवर तैनात असलेले अमलदार इस्माईल शेख आणि पोलीस शिपाई सुमित चव्हाण यांनी या पाकिटाची तपासणी केली. त्यात वाहन चालवण्याचा परवाना, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि साडेसातशे रुपये होते. ओळखपत्राच्या आधारावर संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यात आली. सदर पाकेट यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील प्रवासी पुरुषोत्तम दहेगावकर यांचा असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून रोख रकमेसह तो पाॅकेट परत केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.